दुष्काळाच्या पार्श्र्वभूमीवर, पुण्यातील मानाच्या गणेश मंडळांचा ऐतिहासिक निर्णय!!

दुष्काळाच्या पार्श्र्वभूमीवर, पुण्यातील मानाच्या गणेश मंडळांचा ऐतिहासिक निर्णय!!

पुण्यातील पाचही मानाच्या गणेश मंडळांनी गणेशमूर्तींचे हौदात विसर्जन करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुळा-मुठा नदीच्या पाण्यात श्रींची मूर्तीविसर्जनाची १२३ वर्षांची परंपरा खंडीतकरून राज्यासमोर उभ्या राहिलेल्या भीषण दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर घेतलेला हा ऐतिहासिक निर्णय म्हणावा लागेल.

विसर्जनसाठी खडकवासला धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय झालेला आहे, तरिहि पुण्यातील मानाच्या मंडळांनी घेतलेला हा निर्णय म्हणजे एक स्तुत्य उपक्रम च आहे.

याआधी जून २०१५ मध्ये खडकवासला धरणातील गाळ काढुन, ३०० मंडळातील कार्यकर्त्यानी आधीच अर्धा टीमसी पाणी जास्त साठवण्यास मदत केलेली आहे. त्याचा सर्वांना लाभ झालेला च आहे.

Leave a Reply