Activities

  • श्री तांबडी जोगेश्वरी मंडळाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षातील तिसरा उपक्रम. गुढीपाडव्याच्या निमित्ताने मंडळाने “ममता फौंडेशन” संचालित एड्सग्रस्त मुला-मुलींच्या वसतीगृहाला भेट देऊन मंडळातर्फे खाऊ वाटप केले. या उपक्रमाद्वारे मुलांना गाठी, हॅण्ड टॉवेल, बिस्कीट पुडा आणि पौष्टिक लाडू असे पॅकेट मुलांना वाटण्यात आले. 
  • श्री तांबडी जोगेश्वरी मंडळाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षातील दुसरा उपक्रम. कर्मवीर भाऊसाहेब हिरे हायस्कूल विद्यार्थी सहाय्यता निधीसाठी मंडळाकडून रु. दहा हजार (१००००/-) चा धनादेश शाळेचे मुख्याध्यापक श्री. एस. व्ही. भैलुमे ह्यांच्याकडे दि. २४ मार्च २०१७ रोजी सुपूर्त करण्यात आला.
  •  
  • श्री तांबडी जोगेश्वरी मंडळाच्या शतकोत्तर रौप्य वर्षातील पहिला उपक्रम अतिशय सुंदर रित्या पार पडला. पुण्यनगरीतील मानाचा दुसरा गणपती श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने रोटरी क्लब- सिंहगड रोड आणि वंचित विकास संस्था यांच्या बरोबर शरीर विक्रय करावा लागलेल्या भगिंनीसाठी कॅन्सर निदानासाठीच्या पॅप स्मिअर चाचणी व उपचाराचे शिबिर आयोजित करण्याचे ठरवले होते.त्याप्रमाणे दि. ३० – ३१ डिसेंबर २०१६ व ५- ७ जानेवारी २०१७ या चार दिवशी सुमारे १०० देवदासी भगिंनीची तपासणी आपण केली आहे.शरीरविक्रय कराव्या लागणाऱ्या 100 भगिनींची कॅन्सर निदानासाठीच्या पॅप स्मिअर चाचणी व उपचाराचे शिबिर आयोजित केले होते. त्याचे रिपोर्ट आज त्या सर्व भगिनींना देण्यात आले. त्याच बरोबर संक्रांतीचे वाण म्हणून नॅपकीन, चिवडा व तिळगुळ देण्यात आला. याच कार्यक्रमात सुरवातीला आपल्या शतकोत्तर रौप्य वर्षांच्या लोगोचे तसेच आपल्या मंडळाच्या अतिशय सुंदर अशा २०१७ च्या कॅलेंडरचे प्रकाशन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री चाफेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
  • श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने आपली सामाजिक बांधिलकी जपण्याची परंपरा कायम ठेवत सार्वजनिक गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडावा म्हणून रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून नजर ठेवणारया पुणे पोलीसांसाठी त्यांच्या डोळ्यांना आराम मिळावा या उद्दिष्टाने “औषधी आय ड्रॉप्स” चे १५ सप्टेंबर २०१६ रोजी वाटप  केले. मंडळास या उपक्रमासाठी रोटरी क्लब, सिंहगड रोड, पुणे यांचे सहकार्य लाभले. मंडळातर्फे मंडळाचे उपाध्यक्ष श्री. राजाभाऊ टिकार, कार्यवाह श्री. ऋषिकेश नेऊरगावकर आणि क्लबतर्फे अध्यक्ष डॉ. अरविंद सरसंभी यांनी पोलीस उपायुक्त श्री. सुधीर हिरेमठ यांच्याकडे “आय ड्रॉप्स” च्या 250 बाटल्या सुपूर्द केल्या. याचा लाभ बंदोबस्तावर असलेल्या 2000 हून अधिक पोलीस बांधवांना होणार आहे
  •