Menu Close

प्रवास छायाविष्कारचा – भाग ४

प्रवास छायाविष्कारचा – भाग ४
छायाविष्कार २०१६ कामाची सुरवात तशी आम्ही जानेवारी पासूनच केली. कारण होत – सगळी प्रक्रिया ऑनलाईन करायची जेणेकरून स्पर्धाकांना व आयोजकांना म्हणजेच आम्हाला खूप साऱ्या गोष्टी सोप्या झाल्या असत्या. ह्या सगळ्या कामाची मुख्य जबाबदारी होती समीरच्या खांद्द्यांवर. आणि त्याच्या मदतीला बाकीचे सगळे. ऑफिसच्या वेळा आणि काम सांभाळून आम्ही आमची वेबसाईट साधारण मे महिन्यात चालू केली. आता स्पर्धकांची खूप चांगली सोय झाली होती. ऑनलाईन लॉगिन करायचं, ऑनलाइनच प्रवेश शुल्क भरायच आणि ऑनलाईन फोटो पण जमा करायचे. ह्याच्यामुळे छायाविष्कारला वाढता प्रतिसाद मिळणार होता हे नककी!!
जस आधी सांगितलं तस, आमच्या “टू डू लिस्ट” मध्ये एका गोष्ट आम्ही ठेवली होती. ती गोष्ट ह्यावर्षी करायचीच अशी खूण गाठ  मनाशी बांधली होती. त्यामुळे त्या दृष्टीने आमचे प्रयत्न चालू होते. आणि ह्या प्रयत्नांचे पर्यवसान म्हणजे छायाविष्कार २०१६ साठी मंडळाने आयोजित केलेली “कार्यशाळा”. ही ३ तासांची कार्यशाळा आम्ही परीक्षकांच्या मदतीने पूर्ण केली. ह्या कार्यशाळेत आम्ही ह्या वर्षीचे विषय “सार्वजनिक गणेशोत्सव”, “महाराष्ट्रातील गड-किल्ले” व “विवध प्रार्थनास्थळे” ह्या विषयी माहिती दिली. तसेच काही तांत्रिक बाबींबातही चर्चा झाली. ह्या कार्यशाळेस साधारण ४० फोटोग्राफर्सनी हजेरी लावली होती. सौमित्र आणि कुमार सरांची साथ लाभल्यामुळेच हे सगळं शक्य होत होतं!! ह्या वर्षीच्या विषययाला अनुसरून श्री. पंकज झरेकर ह्यांनी परीक्षणाची जबाबदारी सौमित्र व कुमार सरांच्या खांद्यावरून थोडीशी हलकी करण्याची तयारी दर्शवली तसेच कार्यशाळेत पण मार्गदर्शन केले. 
संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन केल्यामुळे व एकुणच मिळालेल्या प्रसिद्धीमुळे ह्या वर्षी विक्रमी प्रतिसाद मिळत, ८०० होऊन अधिक फोटोस स्पर्धेसाठी आले. ह्यामुळे परीक्षकांचे काम खूपच अवघड बनले. 
ह्या वेळेस प्रायोजक म्हणून “प्राईम्स एण्ड झूम्स” चे अभिजीत मुठा पारितोषिकाची काही जबाबदारी उचलाची तयारी दाखवली. ह्या वेळेस प्रदर्शन होते ११ नोव्हेंबर ते १३ नोव्हेंबर २०१६, बालगंधर्व कलादालन येथे. उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून “एपेक्स कलर लॅब्स” चे श्री. कमरूददीन चिकोडी हे आले होते तर पारितोषीक वितरण समारंभाला श्री. पांडुरंग बलकवडे व श्री. उमेश झिरपे हे होते. सालाबादप्रमाणे पारितोषीक वितरण समारंभाला सूत्रसंचालक म्हणून अभिनेता श्री. सौरभ गोखले ह्यांनी जबाबदारी पेलली. हे छायाविष्कारचे ४ थे वर्ष होते. दरवर्षी साधारण स्पर्धेच्या ३ महिने आधी आम्ही विषय जाहीर करतो. पण पुढचे हे ५ वे वर्ष आहे व पाचव्या वर्षासाठी आपण विषय आधीच जाहीर करावा असे विचार मनात चालू होते. परीक्षकांशी बोलून शेवटच्या दिवशी “सार्वजनिक गणेशोत्सव” व “भारतीय सण व उत्सव” हे विषय जाहीर केले व छायाविष्कारच्या ५ व्या वर्षाची नांदी वाजू लागली!!!
-विनायक सामक

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *