सन्मान शिवाशाहीराचा !!!

“महाराष्ट्र भूषण “!! शिवशाहीर श्री. बाबासाहेब पुरंदरे यांचा “पुण्यनगरीतील ग्रामदेवत, मानाचा दुसरा गणपती, श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे. दिनांक २६ सेप्टेम्बेर २०१५ रोजी त्यांच्या निवासस्थानी सत्कार केला.
शिवशाहीर श्री. बाबासाहेब पुरंदरे यांना नुकताच मिळालेल्या “महाराष्ट्र भूषण” या महाराष्ट्र शासनाच्या सर्वोच नागरी सन्मानानिमित्त मंडळातर्फे त्यांना शाल, श्रीफळ आणि सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
या छोटेखानी समारंभात एका प्रश्नास उत्तर देताना बाबासाहेबांनी सध्याच्या गणेशोत्सवाच्या स्वरूपाविषयी आपली मते स्पष्टपणे मांडली . त्यांच्या म्हण्यानुसार बरीचशी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे त्यांच्या मूळ उद्देशापासून दूर जात आहेत आणि या मुळे सार्वजनिक गणेशोत्सवाचा आत्माच नाहीसा होत चालला आहे . त्याचबरोबर बाबासाहेबांनी बरीचशी सार्वजनिक मंडळे अनेक उत्तमोत्तम सामाजिक उपक्रम हाती घेतात असा उल्लेख करून अशा मंडळांचे कौतुकही केले .
या कार्यक्रमात पुढे बाबासाहेबांनी मंडळाच्या छायाविष्कार या छायाचित्रण स्पर्धेत स्पर्धकांनी मागील दोन वर्षात पाठवलेल्या छायाचित्रांचा आस्वाद घेतला व मंडळाच्या या उपक्रमास तसेच शतकोत्तर रोउप्यमहोत्सवी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमा दरम्यान मंडळाचे ३ कार्यकते (प्रशांत टिकार , सौरभ धडफळे व ऋषिकेश नेहुरगावकर) आणि प्रसिद्ध अभिनेते सौरभ गोखले उपस्तिथ होते. श्री सौरभ गोखले यांनी कार्यक्रमादरम्यान सन्मानपत्राचे वाचन केले.

 

सन्मान शिवाशाहीराचा !!!

सन्मान शिवाशाहीराचा !!!

Leave a Reply